Success Story, IAS Ansar Shaikh: Biography Of Ias Ansar Shaikh Marathi:

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Ias Ansar Shaikh Biography in Marathi लेख ह्या लेख मध्ये तुम्हाला खूपच जास्त मोटिवेशन मिळेल आस मला वाटत, कारण हा लेख अंसार शेख यांचा आहे व हे भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. तर चला मग वाचून घेऊया आजच्या हा Biography Of Ias Ansar Shaikh Marathi लेख पूर्ण पणे.
रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस अंसार शेख कोण आहे? Who Is Ias Ansar Shaikh, the Son of a Rickshaw Driver?
अंसार शेख यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी कौटुंबिक अडचणी, दारिद्रय आणि शिक्षणाचा अभाव यावर मात करून हे Success मिळवले आहे. त्यांचे लहान भाऊ कुटुंबाला मदत करण्यासाठी सातवीत असतानाच शाळा सोडून Garage मध्ये काम करू लागले होते, जेणेकरून अंसार यांना शिक्षण घेता येइल. त्यांच्या या कठोर परिश्रमामुळेच ते देशातील सर्वात Younger आयएएस अधिकारी बनले.
Wikipedia of Ias Ansar Shaikh Marathi: आयएएस अधिकारी अंसार शेख यांचा बायोडाटा
1. अन्सार शेख यांचा एक प्रेरणादायी प्रवास: An inspiring journey of Ansar Sheikh
अंसार शेख यांचा जन्म 1 जून 1994 रोजी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील शेल या छोट्याश्या गावात झाला. त्यांचे वडील युनूस शेख हे रिक्षाचालक होते, तर आई शेतीत मोलमजुरी करत होती. त्याच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे वडील दारूच्या व्यसणामुळे अनेकदा कुटुंबाकडे दुर्लक्ष करत असत, ज्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गरिबी आणि संघर्षाचा सामना करावा लागला.
2. अन्सार शेख यांचे बालपण आणि सुरुवातीचे शिक्षण: Ansar Sheikh’s childhood and early Education
सुरुवात:-
आयएएस अधिकारी अन्सार शेख यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांच्या कुटुंबाकडे दोन वेळच्या जेवणाचीही सोय नव्हती. त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न वयाच्या 15व्या वर्षी झाले, तर लहान भावाला कुटुंबाला मदद करण्यासाठी सातवीमध्ये शाळा सोडावी लागली.
शिक्षणाची आवड:-
या सगळ्या परिस्थितीतही अंसार यांना शिक्षणाचे महत्व समजले. त्यांचे वडील सुरुवातीला त्यांच्या शिक्षणासाठी विरोध करत होते, पण त्यांच्या एका शिक्षकाने त्यांना मदद केली आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
पुणे प्रवास:-
दहावीच्या परीक्षेत 91% गुण मिळाल्यानंतर, त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यात त्यांनी फग्युर्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
3. अन्सार शेख यांचा UPSC परीक्षेचा प्रवास: पदवी शिक्षण आणि तयारी: Ansar Sheikh’s UPSC Exam Journey: Degree Education and Preparation
संघर्ष:-
पुण्यात असतानाही अंसार यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना रूमचे भाडे परवडत नव्हते त्यामुळे ते अनेकदा दिवसभर अभ्यास करून रात्री मंदिरात किंवा रेल्वे स्टेशनवर झोपत असत. त्यांनी कोचिंग देण्याच कामही केले.
अभ्यास:-
त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना UPSC परीक्षेची तयारी करण्यास प्रोत्साहन दिले.
अखंड मेहनत:-
आर्थिक अडचणी असूनही, त्यांनी कठोर परिश्रम केले. दिवसा अभ्यास आणि रात्री Part – Time काम असे त्यांचे वेळापत्रक होते.
4. अन्सार शेख यांचे यशाचे शिखर: The pinnacle of Ansar Sheikh’s success
पहिला प्रयत्न:-
वयाच्या 21 व्या वर्षी 2016 मध्ये, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा दिली.
अखिल भारतीय रँक:-
त्यांची मेहनत आणि संपर्पण यामुळे त्यांना 361 वा अखिल भारतीय रँक (All India Rank 361) मिळाला
सर्वात तरुण IAS:-
या यशाने ते देशातील सर्वात Young IAS OFFICER बनले.
5. अन्सार शेख यांचा सेवेतील प्रवास आणि सध्याचे कार्य: Ansar Sheikh’s journey in service and current work
प्रशिक्षण:-
Ias Ansar Shaikh यांनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केले.
पदभार:-
आयएएस अधिकारी अन्सार शेख यांना पश्चिम बंगाल कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले.
सध्याचे पद:-
सध्या Ias Ansar Shaikh पश्चिम बंगालच्या मालदा येथे अतिरिक्त जिल्हा दांडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अंसार शेख यांचा जीवनप्रवास हे दाखवून देतो कि, कठोर परिश्रम, चिकाटी आणि शिक्षणाप्रति असलेली निष्ठा कोणत्याही परिस्थितीवर मत करून यश मिळवू शकते. त्यांचे जीवन अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. त्यांच्या या प्रवासाने सिद्ध केले कि, परिस्थिती कितीही बिकट असली, तरी स्वप्ने सत्यात उतरू शकतात.
सारांश:-
Ias Ansar Shaikh यांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील रिक्षाचालक होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. या सर्व अडचणीवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले आणि पुण्यातून पदवी प्राप्त केली.
वयाच्या 21 व्या वर्षी 2016 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 361 वा अखिल भारतीय रँक मिळवला. या यशाने भारतातील सर्वात तरुण IAS OFFICER बनले. सध्या ते पश्चिम बंगाल कॅडरमध्ये कार्यरत आहेत. अंसार शेख यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असून, त्यांनी हे सिद्ध केले कि कठोर परिश्रम आणि चिकाटीने कोणतेही ध्येय गाठता येते.
अंसार शेख यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)
अंसार शेख कोण आहेत?
अंसार शेख हे महाराष्ट्रातील एक IAS अधिकारी आहेत, जे 21 व्या वर्षी 2016 मध्ये, पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. ते भारतातील सर्वात तरुण IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
अंसार शेख यांचे मूळ गाव कोणते आहे?
अंसार शेख हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील शेल या छोट्याश्या गावाचे रहवासी आहेत.
अंसार शेख यांचे शिक्षण कुठे झाले?
अंसार शेख यांनी आपले शिक्षण दहावीच्या परीक्षेत 91% गुण मिळाल्यानंतर, त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुणे येथे फग्युर्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पूर्ण केल.
UPSC परीक्षेत अंसार शेख यांच्या रँक किती होता?
आयएएस अंसार शेख यांचा 2016 च्या UPAC परीक्षेत त्यांचा अखिल भारतीय रँक 361 होता.
अंसार शेख यांच्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती?
आयएएस अंसार शेख यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
अंसार शेख यांच्या यशाचे मुख्य कारण काय आहे?
आयएएस अंसार शेख यांचा कठोर परिश्रम, चिकाटी आणि शिक्षणाप्रति असलेली निष्ठा ही त्यांच्या यशाची मुख्य कारणे आहेत. त्यांनी गरिबी आणि कौटुंबिक अडचणीवर मात करून हे यश मिळवले.
सध्या अंसार शेख कुठे कार्यरत आहेत?
सध्या आयएएस अंसार शेख हे पश्चिम बंगाल कॅडरचे अधिकारी आहेत, सध्या पश्चिम बंगालच्या मालदा येथे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
1 thought on “Ias Ansar Shaikh Biography in Marathi: रिक्षा चालकाचा मुलगा, अशा प्रकारे अन्सार शेख वयाच्या २१ व्या वर्षी आयएएस झाला”